Categories
Uncategorized

निमोनिक्स तंत्र’ हे स्मरणशक्ती विकासात नक्की कशी भूमिका बजावते?

त्याची स्मरणशक्ती किती तल्लख आहे..!!, माझी स्मरणशक्ती खूपच कमकुवत आहे !!!! अशी वाक्ये आपण नेहमीच ऐकतो.

प्रत्येकालाच वाटत असते की,आपली स्मरणशक्ती अत्यंत कुशाग्र असावी,आपल्याला सर्व लक्षात राहायला हवे अन् ते वेळेवर आठवायला हवे.स्मरणशक्ती तल्लख असणा-या व्यक्ती अधिक व लवकर यशस्वी होतात,असे संशोधनातून सिद्ध झाले आहे.

स्मरणशक्ती विकासासाठी अनेक कृत्रिम उपाय आहेत,त्यात मानसिक,बौद्धिक आहारयुक्त खुराक अंतर्भूत आहे.सर्वजण सांगतील बदाम खा,हे खा,ते खा…!! ते खाल्ल्यावरही ब-याचदा अपेक्षित परिणाम दिसून येत नाही.तुम्हाला कुणी ‘निमोनिक्स तंत्र’ वापरा असे सांगितलेले आठवणार नाही.कारण याबद्दल फार थोड्यांना माहिती असते.

चला तर मंडळी,आज आपण जाणून घेऊयात की हे ‘निमोनिक्स तंत्र’ आहे तरी काय ??

निमोनिक्स (Pnemonics) शब्द उत्पत्ती विषयी :-

निमोनिक्स हा शब्द ग्रीक पौराणिक कथांमधील स्मरणशक्ती देवता – ‘निमोसाइन’ या शब्दावरून प्रचलित झाला आहे.Pnemonics शब्दात ‘P’ हे अक्षर सायलेंट आहे.

निमोनिक्स म्हणजे असे तंत्र,की जे कोणत्याही गोष्टी आठवणीत ठेवणे सुलभ व सोपे बनवते.

निमोनिक्स तंत्राचे लाभ :-

  1. कुठलीही अवघड वाटणारी गोष्ट सोपी करून ती लक्षात ठेवण्यास साहाय्यभूत ठरते.
  2. मजेदार कोडवर्ड,कीवर्ड मुळे अपेक्षित गोष्टींची उकल करणे सोपे जाते.
  3. सोप्या कीवर्ड्स मुळे लक्षात ठेवणे अगदी सोपे जाते.
  4. आबालवृद्धांसाठी,केजी पासून ते पीजी पर्यंत,तसेच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास,इतकेच काय तर पूर्ण जीवन कारकिर्दीसाठी ही पद्धत प्रभावी.

निमोनिक्स तंत्राचे उपयोजन :-

  1. या यंत्रातील सर्वोच्च महत्त्वाचा घटक असतो,तो म्हणजे – कीवर्ड किंवा कोडवर्ड.आपल्याला कायम लक्षात राहील असा कोडवर्ड किंवा कोडची मालिका तयार करावी लागते,जेणेकरून पुढील गोष्टी लक्षात ठेवणे सुलभ बनतील.
  2. याचबरोबर वापरकर्त्याकडे (युझर) किमान कल्पकवृत्ती असणे गरजेचे असते.
  3. एक उदाहरण देतो, लहानपणी आपल्याला शाळेत इंद्रधनुष्याचे सात रंग लक्षात ठेवण्यासाठी शिक्षकांनी किंवा पालकांनी एक युक्ती सांगितलेली होती,जी आपल्याला आजही तोंडपाठ आहे – ‘तानापिहिनिपाजा’.ही अक्षरे म्हणजे त्या सात रंगांच्या नावाची आद्याक्षरे आहेत.
  4. आपण एखादे स्वरचित गीत किंवा वाक्य तयार करून त्यात असे शब्द समाविष्ट करू शकतो की आपल्याला चटकन हव्या त्या गोष्टी क्षणार्धात आठवल्या पाहिजेल.
  5. युपीएससी,एमपीएससी आयोगाच्या परीक्षेत भूगोल तसेच इतर विषयांसाठीही असे कोडवर्ड तयार करून आपण आपला अभ्यास सोपा बनवू शकतो.

उदाहरणार्थ :- भारताची कोणती राज्ये पाकिस्तानच्या सीमेशी संलग्न आहे,असा जर प्रश्न असेल,तर काय करावे ??

उत्तर :- एक युक्ती आहे,

PaRaG Chala Gaya Jammu-Kashmir.

आता आपण याची उकल करूयात.

Pa – Punjab, Ra- Rajasthan,G-Gujrat & JK – Jammu-Kashmir.

एकूण चार राज्ये पाकिस्तान सीमेशी संलग्न आहेत,हे या युक्तीने सोडविता येईल.

अशा अनेक नानाविध युक्त्या आहेत.जसे की – सार्क,आसियान,बिम्सटेक या आंतराष्ट्रीय प्रादेशिक संघटनांच्या सदस्य देशांची भलीमोठी नावे लक्षात ठेवण्याऐवजी त्यांच्या आद्याक्षरांच्या नावांची एक यथोचित मालिका बनवून ती लक्षात ठेवणे व प्रसंगानुरूप त्या नाममालिकेची उकल करणे.

उदाहरणार्थ –

सार्क संघटनेचे सदस्य देश लक्षात ठेवण्यासाठी एक कोडवर्ड-

MBBS PAIN – एकूण आठ सदस्य देश.

M – Myanmar, B – Bhutan, B-Bangladesh,S – Srilanka, P – Pakistan, A-Afganistan, I – India & N Nepal.

अंक किंवा क्रमांक कसे लक्षात ठेवावेत ??

क्रमांक लक्षात ठेवण्यासाठी क्रमांकाच्या मालिकेचा क्रम लक्षात ठेवणे तसेच त्यातील पुनरुक्ती प्रयोग लक्षात ठेवणे.

उदाहरणार्थ – ९५६१६१×××× या क्रमांकामध्ये ६१ हा अंक दोनदा आला आहे.

तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा किंवा सर्वांचाच वाढदिवस,लग्नाचा वाढदिवस किंवा इतर खास दिवस लक्षात ठेवायचे आहेत,तर मी स्वतः इतिहास विषयाचा रसिक अभ्यासक असल्याने मी त्या तारखांची सांगड भूतकालीन ऐतिहासिक घटनांसोबत लावून,ती तारीख लक्षात ठेवतो.उदाहरणार्थ माझ्या मित्राचा वाढदिवस २१ एप्रिल ला असतो व हे जर मला लक्षात ठेवायचा आहे,तर मी पानिपतचे पहिले युद्ध त्या तारखेला जोडतो.(२१ एप्रिल १५२६ ला हे युद्ध झाले होते)

एखाद्याचा वाढदिवस जर १४ जानेवारीला असेल,तर मकरसंक्रात किंवा पानिपत-३ हा कोडवर्ड वापरायचा.पानिपतचे तिसरे युद्ध १४ जानेवारी १७६१ ला घडले होते.

याचप्रमाणे आपण एखाद्या व्यक्तीचे नाव-गाव हे देखील अशाच पद्धतीने लक्षात ठेवू शकतो.

उदाहरणार्थ :- मयूर – मोर (राष्ट्रीय पक्षी),अभिमन्यू – महाभारत,पंकज – कमळ इ.

आपण या तंत्रासोबत फोटोग्राफिक मेमरीचाही अवलंब करू शकतात.चेहरा लक्षात ठेवण्यासाठी याचा प्रभावी वापर करता येईल.

मला इतिहासाची आवड मी ऐतिहासिक घटनांशी सांगड घालतो,पण इतर जण त्यांच्या त्यांच्या वैयक्तिक आवडी-निवडी,छंद,कल्पकता यांच्या आधारे गोष्टी लक्षात ठेवू शकतात,वर मी म्हटलेलेच आहे – वापरकर्त्याकडे किमान कल्पकवृत्ती असणे गरजेचे आहे.

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे तुम्ही कोणतेही कोडवर्ड किंवा गीत/वाक्य काहीही वापरा,सर्वांत महत्त्वाचा उद्देश हाच की,एखादी गोष्ट दीर्घकाळ स्मरणात ठेवणे होय.इथे साध्य महत्त्वाचे आहे,साधनशुचिता नव्हे.

चला तर मंडळी,निरोप घेतो.अपेक्षा करतो की वाचकांना निमोनिक्स तंत्राची पुरेशी माहिती मिळाली असेल.

By Bhavesh

सुरुवातीला माझ्या bninstitute.com वर सर्वांच स्वागत आहे मी आज या वेबसाइटवर . motivation ,youtube learn,new thing ,teaching… ब्लॉग्स पोहोचवत राहील. आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे वेबसाइट चालू करत आहे.

Leave a comment