Categories

कोविड-19 ची चाचणी कशाप्रकारे केली जाते? रुग्णाची चाचणी सकारात्मक (पॉसिटीव्ह) येणे म्हणजे नक्की काय?मूलतः उत्तर दिले: कोविड-१९ ची चाचणी कश्या प्रकारे केली जाते? रुग्ण पॉसिटीव्ह येणे म्हणजे नक्की काय?

कॉविड 19 च्या चाचण्या खलील प्रमाणे आहेत.

१. RT -PCR (रिव्हर्स ट्रान्स्क्रिपशन पोलीमरेज चैन रिअकॅशन) ही सध्या केली जाणारी आणि ज्याला आपण गोल्ड स्टॅंडर्ड म्हणतो अशी टेस्ट. ह्यामध्ये तुमच्या नाकातील आणि घशातील सॅम्पल घेऊन ते प्रयोगशाळेत तपासले जाते.

ह्यामध्ये मुख्यतः कॉविड 19 हा जो आर एन ए वायरस आहे त्याला कॉम्प्लिमेंट डि एन ए मध्ये बदलून नंतर त्याच्या काही भागाचे अम्प्लिफिकेशन (वृद्धिंगत ) करून त्यानंतर त्याला फ्लूरोससेन्ट द्वारे ओळखण्यात येते . सगळ्या प्रक्रियेला खुप वेळ लागतो आणि रिपोर्ट यायला 24–48 तास लागू शकतात.

ह्या टेस्ट ची अचूकता जरी चांगली असली तरी हिची सेन्सिटीव्हीटी केवळ 65–70% एवढीच आहे. म्हणजेच 100 पैकी 30 लोकांचे रिपोर्ट हे false negative येऊ शकतात. ह्याच मुख्य कारण म्हणजे सॅम्पल योग्य पद्धतीने घेता न येणे अथवा ज्या पेशंट ला लक्षणे सुरू होऊन 6–7 दिवस झालेली आहेत अशां लोकांमध्ये विषाणू घशात कमी प्रमाणात राहून तो फुप्फुसांमध्ये गेलेला असतो.म्हणून घशातील सॅम्पल negative येऊ शकते. अशा पेशंट च्या फुप्फुसांमधून दुर्बिणीतून सॅम्पल काढून पाठविल्यास सेन्सिटीव्हीटी 95% पर्यंत सुधारते.

२. CB -NAAT (काट्रीज बेस्ड न्युक्लिक ऍसिड अम्प्लिफिकेशन टेस्ट)

ही टेस्ट टी बी साठी प्रसिद्ध असली तरी कॉविड साठी ह्या टेस्ट चा उपयोग करता येतो. ह्यात RT PCR सारखीच नाकातून आणि घशातून सॅम्पल घेऊन वायरस मधील जीन्स चे न्युक्लिक ऍसिड तपासतात. इ आणि एन जीन्स दोन्ही एका वेळीच तपासता येतात.

प्रक्रिया PCR पेक्षा जलदगतीने होते आणि रिपोर्ट काही तासात उपलब्ध होतो. म्हणून अत्यवस्थ पेशंट्स साठी ही टेस्ट उपयोगी पडते जेणेकरून त्वरित उपचार सुरू करता येतात.

३. कॉविड अँटीजन टेस्टिंग.

ह्यात परत नाक आणि घशातून च सॅम्पल काढून ह्यावेळी मशीन मध्ये अँटीबोडिस ला हे सॅम्पल एक्सपोस करतात. कॉविड चा अँटीजन असेल तर तो ह्या अँटीबोडिस ला चिटकतो आणि निदान होते.

टेस्ट साठी अर्ध्या तासाचा अवधी मात्र लागतो. त्यामुळे खूप मोठ्या लोकांची स्क्रिनिंग साठी उदाहरणार्थ धारावी जिथे फार मोठ्या प्रमाणावर केसेस आढळून आल्या आशा ठिकाणी ह्या टेस्ट चा उपयोग करता येतो. मात्र सेन्सिटीव्हीटी ही 30–70% एवढीच आहे.

४. कॉविड अँटीबॉडी टेस्ट

IgM आणि Ig G अँटी बॉडी ह्या पेशंट च्या शरीरात तयार होतात रोगाविरुद्ध लढण्याकरिता. IgM अँटीबॉडी इन्फेकॅशन नंतर 3–4 दिवसांनी व Ig G अँटी बॉडी 8–10 दिवसांनी तयार व्हायला सुरुवात होते.ह्या टेस्ट साठी रक्ताचे सॅम्पल घेऊन ELISA द्वारे टेस्ट करण्यात येते. परंतु अँटी बॉडी तयार होण्यासाठी लागत असलेल्या अवधी मुळे ह्या टेस्ट फक्त आजाराचा लोकसंख्येमध्ये असलेला प्रादुर्भाव लक्षात घेण्याकरताच ह्या टेस्ट चा उपयोग होतो.

धन्यवाद.